Posts

काल ' करूया उद्याची बात ' मराठी चित्रपट पाहिला .तसा जुनाच आहे. २०१० साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटा मध्ये नेहा पेंडसे व पंकज विष्णु यांच्या प्रमुख भुमिका असुन ग्लोबल वॉर्मिंग वर आधारित कथा आहे.हे दोघे पर्यावरण शास्त्राचा अभ्यास करत असतात.ग्लोबल वॉर्मिंगला ते कसे यशस्वीरित्या तोंड देतात याचे वर्णन या चित्रपटात केले आहे.पण यातील कथेचे व वास्तवात असणारी ' राजापुर ची गंगा ' हीच्या अस्तित्वाचे साधर्म्य आढळते. राजापुर...रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक व नैसर्गिक राजवैभव लाभलेले तालुक्याचे सुंदर असे ठिकाण..गावापासून २ ते १.५ किमी. अंतरावर धुतपापेश्वराचे मंदिर आहे व मंदिरा जवळच निसर्गाचे एक आश्चर्य मानली जाणारी 'राजापुर ची गंगा 'आहे. प्राचीन कथेनुसार १८८३ साली एक वृध्द शेतकरी वृध्दत्वामुळे बनारस ला जाऊन गंगा नदीचे दर्शन घेऊ शकत नसल्यामुळे राजा भगीरथ ची प्रार्थना करतो व भगीरथ राजा प्रसन्न होऊन आपली कन्या गंगा तुझ्याच शेतामध्ये प्रकट होईल असे आश्वासन देतो.कथेनुसार तो शेतकरी त्यावेळी भाताच्या शेतात उभा होता व आजही नदी आली की प्रथम त्या पाण्यात भाताचा कचरा निघतो. तर ही नदी आजतागायत दर तीन वर्षांनी येते व साधारणतः तीन महिने प्रवाहित होत राहाते व जशी अचानक येते तशीच अचानक गायब पण होते.ही जागा राजापुर पासून २५मी.उंचीवर आहे व ती जागा एरवी कोरडी असते.तीन कुंड एकमेकांपासून १मी.अंतरावर बांधलेली आहेत. महत्वाची गोष्ट या तीन कुंडातील पाण्याचे तापमान वेगवेगळे असते . लोकांची गर्दी अशा वेळी यात्रेचा माहाैल तयार करते.शहरातील जवाहर चौकापासून १किमी. अंतरावर 'उन्हाळे ' नावाचा गरम पाण्याचा धबधबा आहे.त्या पाण्यामध्ये सल्फर चे प्रमाण जास्त असुन त्या पाण्याने त्वचा रोग बरे होतात. बरेचसे वाचक बोअर झाले असतील..कदाचित म्हणतील काय हे ... 'भटकंती 'मधील मिलींद गुणाजी सारखे वर्णन करतेस...पण पुढेच तर खरी मजा आहे. दिनांक २९ जुलै २०१५ ,वृत्तपत्र 'लोकसत्ता' सनसनाटी बातमी ...आधीच आश्चर्य असणारी राजापुर ची गंगा ...अनियमित पणे अवतरली.निसर्गाला चक्रावून टाकणारया घटनेत सर्वसाधारण पणे ३ वर्षांनी प्रकट होणारया गंगेने आपले येण्याचे Surprising Time Table change केलंय...कसे??? २९ जुलै २०१५ ला तिचे अवघ्या १० महिन्यांत पुनरागमन झाले होते. २०११ च्या फेब्रुवारी मध्ये आलेली गंगा परत त्याच वर्षी जुन मध्ये येते,त्यानंतर पुन्हा १० महिन्यांत म्हणजे एप्रिल २०१२ ला अवतरित होतेव त्यावेळी नेहमी प्रमाणे ३ महिने वास्तव्य न करता थोड्याच दिवसांत निर्गमन करते आणि परत मार्च २०१३ येते.अतिआश्चर्य चकित करणारी गोष्ट म्हणजे सप्टेंबर २०१४ पर्यंत ती प्रवाही राहून तिने आपले नवीन रेकॉर्ड बनवले.त्यानंतर ती जुलै २०१५ ला परत आली. अशाच एका नदीचे वर्णन त्या चित्रपटात केलेले असुन अशा अचानक नदीच्या येण्याचे कारण अगदी मनाला पटेल असे सांगितले आहे. जमिनी पृष्ठाखालचे पाणी स्थिर नसुन पाण्याच्या पातळीत फरक झाला की पाण्यावर दाब वाढतो व त्यामुळे ते पाणी वाट मिळेल तिकडे वाहाते.मग जमिनीला खोलवर भेगा असतील तर त्यामधून हे पाणी अचानकपणे तिथुन बाहेर पडतेव पाण्यावरील दाब कमी झाला की ते पाणी गायब होते.अगदी समुद्रातील पाणी ही येण्याची शक्यता नाकारता येत नाही .. जाणून घ्यायचंय..??Coriolis force मुळे मोठी वादळे तयार होतात व पाण्याच्या त्सुनामी लाटा खडकावर जोरजोरात आपटतात खडकांना लांबच लांब भेगा पडून त्या भेगामधूनही ते खारे पाणी नक्कीच येवू शकते.असे शक्यतो एकतर पावसाळ्यात किंवा समुद्राच्या भरती वेळी होऊ शकते.. कधीकधी भरतीमुळे पाणी फवारयाप्रमाणे येते नक्की आलेले पाणी कुठून आलंय ..कसं असेल याचा विचार ही करत नाही. आपल्या या गंगेचे पाणी अजिबात घातक नाही ही गोष्ट जेवढी खरी आहे तेवढेच हे ही खरे आहे की मानव नावाचा अविचारी प्राणी त्या कुंडामध्ये उतरुन तिथेच अंघोळ करतोव दुसरयांचे आरोग्य धोक्यात आणतो. मानवाने श्रद्धेबरोबरच तिच्या अनियमित येण्याबाबतचा विचार करायला हवा..येण्याबरोबरच ती आपणास काही संकेत तर देत नाही ना...यावर मनन करायला हवे..अनेकांचे Status वाचले मी."Iam cool guy but global warming made me hot" म्हणजे सर्व काही पर्यावरणावर ढकलायचं व मोकळं व्हायचं...माझी एक पर्यावरण प्रेमी मैत्रिण आहे.आजोबांनी ही कौतुकाने हरिणी नाव ठेवलंय..तर हीच्या वडिलांनी वादळात मोडलेले झाड तोडले म्हणून चक्क रडली व तिने आपल्या घरी अनेक झाडे लावली.. NSS च्या Camp मध्ये हिची Idea ...वृक्षलागवड... अगदी भर उन्हाळ्यात ही वृक्ष लागवड करून त्यांची जपणूक करून या हरिणीने फक्त तिच्या कुटूंबालाच नव्हे तर सर्व समाजा समोर एक आदर्श ठेवलाय. आजारी रूग्णाची डॉक्टर जसे औषधपाणी करुन काळजी घेतात व बरे करेपर्यंत सेवा करतात अगदी तसेच ग्लोबल वॉर्मिंग नावाचा आजार झालेल्या आपल्या लाडक्या पृथ्वी रूपी पेशंटला वृक्षलागवड रूपी औषध पाणी करूया...व Local Thinking नव्हे तर Global Thinking करूया